काटोल विधानसभा मतदारसंघ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

काटोल विधानसभा मतदारसंघ - ४८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार काटोल मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका, काटोल तालुका आणि नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील वाडी महसूल मंडळ (भाग- अ) गावे - बंधारा, कवडीमेट, सिरपूर, भूयारी, खैरी, आमगांव, ढगा, बाजारगांव, खापरी, शिवा, सावंगा, वंजारा, पाचनवरी, सातनवरी, मालेगांव (खुर्द), मालेगांव (बुद्रुक), पाद्रीखापा, मोहगांव (बुद्रुक), मोहगांव (खुर्द), धामना, लिंगा, पेठकाळडोंगरी, चंद्रपूर आणि व्याहाड यांचा समावेश होतो. काटोल हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. अनिल वसंतराव देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →