काइट्स (चित्रपट)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

काइट्स हा २०१० चा अनुराग बसू दिग्दर्शित भारतीय रोमँटिक अ‍ॅक्शन थरारपट आहे. या चित्रपटाची कथा राकेश रोशन यांनी लिहिली आणि निर्मित केली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, बारबरा मोरी, कंगना राणावत आणि कबीर बेदी यांनी भूमिका केल्या आहेत.

ब्रेट रॅटनर प्रस्तूत काइट्स: द रीमिक्स हा इंग्रजी भाषेत उत्तर अमेरिकेत प्रदर्शित झाला. उत्तर अमेरिकेत २०८ थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावेळचा सर्वात मोठा बॉलिवूड प्रसर्शन करणारा ठरला. आठवड्याच्या शेवटी टॉप टेनमध्ये पोहोचणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता, जरी माय नेम इज खानने पहिल्या आठवड्याच्या शेवटी उत्तर अमेरिकन कमाई जास्त केली होती. चांगली सुरुवात असूनही, चित्रपटाला त्याच्या पुर्ण कमाईत फक्त ४७ कोटी (US$१०.४३ दशलक्ष) कमावणे शक्य झाले. स्थानिक पातळीवर, चित्रपटावर करण्यात आलेल्या प्रमुख टीकांपैकी एक म्हणजे बहुभाषिक कथेवर आधारित होती ज्यामध्ये बहुतेक संवाद स्पॅनिश आणि इंग्रजीमध्ये होते, तर भारतात त्याची जाहिरात हिंदी भाषेतील चित्रपट म्हणून करण्यात आली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →