कांग्रा चित्रकला भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील स्थानिक चित्रकला आहे.१८ व्या शतकात मुख्य ठिकाणी म्हणजे बसोहली शाळेत ही चित्रकला दुर्लक्षित होऊ लागली. पण लवकरच पहाडी पेंटिंग शाळेत या कलेला उत्तेजन मिळाले आणि तिचा विस्तार वाढू लागला आणि या कलेला कांग्रा पेंटिंग नावाने संबोधू लागले.
कांग्रा पेंटिंगची मुख्य केंद्र स्थाने गुलर, बसोहली,चंबा,नुरपूर,बिलासपुर,कांग्रा ही होती पण नंतर ती मंडी,सुकेत,कौलु,अर्की,नलगर,तहरी,गरवळ पर्यंत पोहचली. आणि आता या सर्व केंद्रांना पहाडी पेंटिंग म्हणून संबोधू लागले. भारत देशाचे पहाडी प्रदेशात म्हणजेच हिमालय पर्वतातील उप हिमालय पर्वताचे हिमाचल प्रदेश राज्यात या कलेचे कामकाज चालते म्हणून याला पहाडी पेंटिंग नाव सुचविले होते. पहाडी पेंटिंगचा विकास आणि विस्तार हे कांग्रा स्कूलचे वैशिष्ट्य आहे. इसवी सन १७६५ ते १८२३ या महाराजा संसार चंद यांच्या काळात पहाडी पैंटिंगला त्यांनी राजाश्रय दिला होता आणि त्यामुळे पहाडी पेंटिंग हे महत्त्वाचे केंद्र स्थान होते. आपणा कोणास या पेंटिंगचे उत्कृष्ट नमुने पाहावयाचे असतील तर आपण कांग्रा हिमाचलचे कांग्रा फोर्ट मधील महाराजा संसार चंद वस्तु संग्रहालयाला भेट देऊ शकता. हे वस्तु संग्रहालय कांग्रा येथील एर्स्त-वहिले या राजघराण्याने निर्माण केलेले आहे. कांग्रा पेंटिंग ही पहाडी पेंटिंग स्कूलचा एक भाग आहे त्याचेवर १७ आणि १९ व्या शतकात राजपूत राजवटीचा आधार होता.
कांग्रा चित्रकला
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.