कलिखो पुल (२० जुलै १९६९ - ९ ऑगस्ट २०१६) हे भारतीय राजकारणी आणि २०१६ मध्ये थोड्या काळासाठी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत ते हायुलियांग विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले. काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्षाच्या काही निवडक सदस्यांच्या पाठिंब्याने त्यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. तथापि, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने विविध कारणास्तव या नियुक्तीच्या विरोधात निर्णय दिला.
९ ऑगस्ट २०१६ रोजी, पुल यांनी इटानगर येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली.
कलिखो पुल
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.