कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पंढरपूर)

या विषयावर तज्ञ बना.

प्रस्तावना:

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय हे रयत शिक्षण संस्थेचे पंढरपूर शहरातील महाविद्यालय आहे. संत गाडगे बाबा यांच्या विनंतीवरून या महाविद्यालयाची स्थापना झाली. या महाविद्यालयाची स्थापना १९६० साली झाली.

या महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना जात, पंथ, धर्म, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती यांचा विचार न करता शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी केली गेली होती. महाविदयालयामध्ये कनिष्ठ विभाग असून यात किमान कौशल्यावर आधारित विविध विषयांवर पदवी अभ्यासक्रम आहे. हे पुणे पंढरपूर राज्य महामार्गावर सुमारे १२ एकर प्रांगणात आहे. महाविद्यालयामध्ये सभागृह, वेगवेगळ्या व्यायामशाळा, प्रशासकीय क्षेत्र, प्रयोगशाळा, महिला आणि पुरुष वसतिगृहे, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, वाचन खोल्या, संगणककृत ग्रंथालय आहे. या महाविद्यालयात जवळजवळ सर्व पायाभूत सुविधा स्थापन केल्या आहेत . महाविद्यालयाला १६ सप्टेबर, २००४ रोजी नॅक बंगळुरू ब ++ सह अधिकृत करण्यात आले आहे.

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना १९१९ साली सातारा येथे केली. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →