कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ - २५९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदार संघ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कराड उत्तर मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या १. खटाव तालुक्यातील पुसेसावळी महसूल मंडळ, २. कोरेगांव तालुक्यातील वाठार किरोली, रहिमतपूर ही महसूल मंडळे आणि रहिमतपूर नगरपालिका, ३. सातारा तालुक्यातील अपशिंगे आणि नागठाणे ही महसूल मंडळे आणि ४. कराड तालुक्यातील इंदोली, मसूर, उंब्रज आणि कोपर्डे हवेली ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. कराड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.
भारतीय जनता पक्षाचे श्री. मनोज भीमराव घोरपडे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.