कन्याकुमारी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कन्याकुमारी

कन्याकुमारी/कन्नियाकुमरि (तमिळ: கன்னியாகுமரி, मल्याळम: കന്യാകുമാരി संस्कृत: कन्याकुमारी) हे एक तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी ह्या जिल्ह्यातील एक प्रमुख गाव आहे तसेच ते तमिळनाडू राज्यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन केंद्र देखील आहे. भारताच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या भूमीचा टोकावर असणारे हे गाव पूर्वी केप कॉमोरीन ह्या नावाने देखील ओळखले जाते.तसेच स्थानिक भाषेत (तमिळ) ह्याचा उच्चार कन्नीकुमरी असा देखील केला जातो. कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रमुख प्रशासनिक केंद्र नागरकोविल (२२ कि.मी.दूर) व केरळची राजधानी तिरुवनंतपुरम (८५ कि.मी.दूर) ही दोन शहरे कन्याकुमारी ह्या गावापासून जवळच आहेत.भारतातील एक प्रमुख पर्यटन केंद्र असलेले कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक, तिरुवल्लुवर पुतळा इत्यादी वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे.

कन्याकुमारी रेल्वे स्थानक कन्याकुमारीला भारतामधील सर्व प्रमुख शहरांसोबत जोडते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →