कंकर, गंडेर, पांढऱ्या बुज्या, कामरी, सफेत कुडावळ, काकणघार, खारी बलई, खुबळ, पांढरा अवाक, सफेत खुबळ (इंग्लिश: White Ibis) हा एक पक्षी आहे.
याला हिंदी मध्ये कचाटोर,दिढर मुंड,मुंडा,मुंडूख,सफेद बाज,सफेद बुज्जा असे म्हणतात.
याला गुजरातीमध्ये धोली कांकणसार असे म्हणतात.
याला तेलगुमध्ये तेल्ल कंकणम असे म्हणतात.
ओळख
आकाराने कोंबडीपेक्षा मोठा असतो.पाणथळीतील पांढरा पक्षी.डोके व मान काळी.त्यांवर पिसे नसतात.कोरलच्या चोचीप्रमाणे खाली वाकलेली चोच.विणीच्या हंगामात पाठ व पंख काळपट करडे.मानेच्या बुडाशी सुंदर,सुबक पिसे. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
वितरण
भारत,नेपाळ आणि श्रीलंका या भागांत निवासी आणि भटके
निवासस्थाने
दलदली आणि सरोवर
कंकर (पक्षी)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.