ओय लक्की! लक्की ओय!

या विषयावर तज्ञ बना.

ओय लक्की! लक्की ओय! हा २००८ चा हिंदी भाषेतील गुन्हेगारी विनोदी चित्रपट आहे ज्यामध्ये अभय देओल, परेश रावल, नीतू चंद्रा, मनु ऋषी, मनजोत सिंग आणि अर्चना पूरण सिंग यांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट दिबाकर बॅनर्जी यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हा चित्रपट मूळ दिल्लीतील विकासपुरी येथील देविंदर सिंग उर्फ बंटी या खऱ्या आयुष्यातील "सुपर-चोर" याच्या आयुष्यातील षड्यंत्रांपासून प्रेरित आहे.

हा चित्रपट सरासरी कमाई करणारा होता, व त्याची ६१.४ दशलक्ष (US$१.३६ दशलक्ष) कमाई झाली. हा २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर दोन दिवसांनी प्रदर्शित झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →