ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळले. एकदिवसीय सामने हे २०२३ च्या पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनले.
मुळात, हा दौरा मार्च २०२१ मध्ये होणार होता आणि तीन कसोटी सामने खेळवले जाणार होते. ते सामने २०१९-२०२१ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग बनले असते. तथापि, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे तो दौरा फेब्रुवारी २०२१ मध्ये पुढे ढकलण्यात आला.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३
या विषयावर तज्ञ बना.