ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९९४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि आठ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकेवर १९७० साली लादलेली बंदी १९९१ साली उठविण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १९७० मध्ये चार कसोटी सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर प्रथमच एकदिवसीय सामने खेळले.
प्रस्तावित श्रीलंकेचा दौरा रद्द करून ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेत मालिका खेळविण्याचे ठरवले, त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाला ऑस्ट्रेलियाने काही रक्कम नुकसानभरपाई म्हणून पोचती केली. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आणि एकदिवसीय मालिका देखील ४-४ अशी बरोबरीत सुटली.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९३-९४
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!