ऑलिंपिक एरलाइन्स

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ऑलिंपिक एरलाइन्स (ग्रीक भाषा: Ολυμπιακές Αερογραμμές, ऑलिंपियाकेस एरोग्रामेस) ह ग्रीसमधील विमानवाहतूक कंपनी होती. याला ऑलिंपिक एरवेझ असेही नाव होते. ही कंपनी ग्रीसची मुख्य कंपनी होती. या कंपनीचे मुख्यालय अथेन्स शहरात होते. कंपनीच्या ३७ देशांतर्गत आणि ३२ आंतरराष्ट्रीय सेवा आहेत. कंपनीचा मुख्य तळ अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ असून, थेसालोनिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, “मेसाडोनिया”, हेराकिलो आंतरराष्ट्रीय विमानतळ, “निकोस काझांतझाकिस” आणि रोड्स आंतरराष्ट्रीय विमानतळ, “डायगोरस” येथे हब्स आहेत. तसेच कंपनीचा लंडन येथील हिथ्रो विमानतळावर सुद्धा तळ आहे. डिसेंबर २००७ पर्यंत कंपनीचे ८,५०० कर्मचारी होते.

ऑलिम्पिक एरलाइन्सला त्यांच्या सुरक्षेसंबंधातील व्यवस्थेसाठी आयएटीए कडून आयओएसए मानांकन मिळालेले आहे.

६ मार्च २००९ला ग्रीक राज्याने कंपनीचे हवाई कार्ये, तळावरील कार्ये तसेच तांत्रिक कार्ये मार्फिन इन्वेस्टमेंट ग्रुप (ग्रीसमधील सगळ्यात मोठी गुंतवणूक कंपनी)ला विकत असल्याची घोषणा केली, ज्याने राज्याची ३५ वर्षाची मालकी संपुष्टात आली.

२९ सप्टेंबर २००९ला ऑलिम्पिक एरलाइन्स ने त्यांचे जवळपास सगळी कार्ये आणि हवाई सेवा बंद केल्या. ऑलिम्पिक एर नावाची नवीन खाजगी कंपनी स्थापन्यात आली. त्यानंतरही काही काळ कंपनीची काही ग्रीक बेट तसेच युरोपिअन युनियनच्या बाहेर काही ठिकाणी सेवा सुरू होती जी नंतर एक सरकारी टेंडर काढून तिचे वाटप करण्यात आले. ३१ डिसेंबर २००९ला कंपनी संपूर्णपणे बंद करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →