एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत.
इसवी सनाच्या ७ व्या शतकात एस्टोनियातील वायकिंग जमातीच्या लोकांनी स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला. इसवी सनाच्या १२ व्या शतकात उत्तर एस्टोनियावर डॅनीश साम्राज्याचे निर्माण झाले तर दक्षिण एस्टोनियावर जर्मन पवित्र रोमन साम्राज्याचे अधिपत्य निर्माण झाले. इसवीसनाच्या १६ व्या शतकात एस्टोनियावर स्वीडिश साम्राज्याचे अधिपत्य निर्माण झाले. इसवी सन १७०० ते १७२१ दरम्यान झालेल्या रशियन स्वीडिश युद्धानंतर एस्टोनियावर रशियन साम्राज्याचे अधिपत्य निर्माण झाले. १८१९ साली एस्टोनियन जनतेने रशियन साम्राज्याच्याविरुद्ध उठाव केला पण तो उठाव अयशस्वी झाला. पहिल्या महायुद्धानंतर एस्टोनियन जनतेने रशियन राज्यक्रांतीचा फायदा घेऊन पुन्हा एकदा स्वातंत्र्ययुद्ध सुरू केले. मात्र रशियन साम्यवादी पक्षाच्या जहाल साम्यवादी कम्युनिस्ट बोलशेव्हिक गटाच्या सरकारने एस्टोनियन स्वातंत्र्यसैनिकांचा पराभव केला अणि एस्टोनियाचा सोव्हिएत संघराज्यात समावेश केला. १९९१ सालापर्यंत एस्टोनिया हे सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. २० ऑगस्ट १९९१ रोजी एस्टोनियाला स्वातंत्र्य मिळाले. तालिन ही एस्टोनियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
एस्टोनिया
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!