एमिली डिकिंसन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

एमिली डिकिंसन

एमिली एलिझाबेथ डिकिन्सन (१० डिसेंबर १८३० - १५ मे १८८६) ही एक अमेरिकन कवयित्री होती. डिकिन्सनचा जन्म मॅसेच्युसेट्सच्या एमहर्स्ट येथे झाला. त्यांचे कुटुंब त्यांच्या समुदायामधील एक नामांकित कुटुंब होते. त्यांनी तारुण्यात सात वर्षे अ‍ॅम्हर्स्ट अ‍ॅकॅडमीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर अतिशय थोड्या काळासाठी त्या माउंट होलीओक फीमेल सेमिनरीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ती अमहर्स्ट येथील तिच्या कुटुंबियांच्या घरी परतली.

पुराव्यांवरून असे दिसून येते की डिकिंसन यांनी आपले बरेचसे आयुष्य एकांतवासात घालवले. स्थानिय लोक तिला विक्षिप्त समजत. तिने पांढऱ्या कपड्यांची विशिष्ट आवड होती. तिला तिच्या घरी आलेले अतिथी विषेश आवडत नव्हते. तसेच तिला तिचा शयनगृह सोडण्यासही फारसे आवडत नसे. डिकिंसन यांनी कधीही लग्न केले नाही. तिच्या आणि इतरांमधील मैत्री हे पूर्णतः पत्रव्यवहारानेच होत होती.

डिकिंसन ही मोठ्या प्रमाणात कविता करणारी कवयित्री होती. तिने जवळजवळ १८०० कविता लिहिल्या. परंतु तिच्या आयुष्यात फारचे कमी, डझनापेक्षा कमी, कविता प्रकाशित झाल्या. त्यावेळेस प्रकाशित झालेल्या कविता परंपरागत काव्यात्मक नियमांनुसार ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संपादित केल्या गेल्या होत्या. तिच्या कविता तिच्या काळाच्या मानाने विचित्र होत्या. तिच्या कवितांमध्ये लहान ओळी होत्या, सामान्यत: शीर्षक नसत आणि बऱ्याचदा तिरकस यमक तसेच अपारंपरिक व्याकरण आणि विरामचिन्हे वापरली होती. तिच्या बऱ्याच कवितांमध्ये मृत्यू आणि अमरत्व या दोन विषयांवर होत्या. तसेच तिने लिहिलेल्या तिच्या मित्रांना लिहिलेल्या पत्रांमध्ये हाच विषय असे.

डिकिंसनच्या ओळखीच्या लोकांनाच तिच्या लिखाणाबद्दल माहिती होती. परंतु इ.स. १८८६ मध्ये तिच्या मृत्यूनंतर तिच्या धाकट्या बहीणीला, लाव्हिनियाला, तिच्या लिहिलेल्या कवितांचा शोध लागला आणि तेव्हा तिने डिकिंसनचे काम जगासमोर आणले. तिचा पहिला काव्यसंग्रह इ.स. १८९० मध्ये थॉमस वेंटवर्थ हिगिन्सन आणि मॅबेल लूमिस टॉड यांनी प्रकाशित केला होता. दोघांनी मुळ कविता मोठ्या प्रमाणात संपादित केलेली होती. १९९८ च्या न्यू यॉर्क टाईम्सच्या लेखात असे दिसून आले की डिकिंसनच्या कार्यामध्ये बऱ्याच संपादनांमध्ये "सुसान" हे नाव बहुधा जाणीवपूर्वक काढून टाकले गेले होते. डिकिंसनच्या कमीतकमी अकरा कविता तिने तिच्या मेव्हणीला, सुसान हंटिंग्टन गिलबर्ट डिकिनसन, यांना समर्पित केल्या आहेत. बहुतेक टॉड यांनी हे सर्व समर्पण मिटवले असावेत. इ.स. १९५५ मध्ये थॉमस एच. जॉनसन यांनी द पोएम्स ऑफ एमिली डिकिंसन या नावाचे पुस्तक प्रकाशित केले. तेव्हा प्रथमच तिच्या कवितांचा पूर्ण आणि मुळ संग्रह उपलब्ध झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →