एडगर ॲलन पो

यामागील विज्ञान आणि इतिहास.

एडगर ॲलन पो

एडगर ॲलन पो (जन्म : १९ जानेवारी १८०९; - ७ ऑक्टोबर १८४९) हा अमेरिकन लेखक, कवी, संपादक आणि समीक्षक होता. त्याला अमेरिकन स्वच्छंदतावादाचा अध्वर्यू समजले जाते.

रहस्य व गूढ कथांसाठी प्रसिद्ध असलेला पो अमेरिकेतला आद्य लघुकथालेखक होता. रहस्य ह्या कथाप्रकाराचा तो जनक मानला जातो. त्यावेळी उदयाला येत असलेल्या विज्ञान लेख प्रकारातही त्याने भर टाकलीअसे मानले जाते. नावाजलेल्या अमेरिकी लेखकांत तो पहिला असा होता ज्याने लेखनावरच उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे त्याला आर्थिक व साहित्यिक आयुष्यात अडचणी सहन कराव्या लागल्या.

एडगर ॲलन पोचा जन्म बॉस्टनमध्ये झाला. त्याचे जन्मनाव एडगर पो असे होते. लहानपणीच आईवडील वारल्यावर रिचमंडमधील जॉन आणि फ्रान्सिस ॲलन यांनी त्याला आश्रय दिला, पण त्याला कायदेशीर दत्तक घेतले नाही. व्हर्जिनिया विद्यापीठात शिक्षण घेण्याचा तसेच सैन्यात नोकरी करण्याचे असफल प्रयत्‍न केल्यानंतर पो ॲलन कुटुंबापासून वेगळा झाला. पोने आपला पहिला कवितासंग्रह टेमरलेन अँड अदर पोएम्स १८२७ मध्ये अ बॉस्टनियन या नावाने प्रकाशित केला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →