एचआरसी/आरइएस/४८/१३ ː स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत पर्यावरणाचा मानवी हक्क हा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने (एचआरसी) केलेला ठराव आहे. जो निरोगी वातावरणाला मानवी हक्क म्हणून मान्यता देतो. एचआरसीच्या ४८ व्या सत्रात हे स्वीकारण्यात आले. एचआरसीने ठरावात मानवी हक्क मान्य केल्याची पहिलीच वेळ आहे. मसुदा ठराव कोस्टा रिका (पेनहोल्डर), मोरोक्को, स्लोव्हेनिया, स्वित्झर्लंड आणि मालदीव यांचा समावेश असलेल्या कोअर ग्रुपने मांडला होता. या ठरावाच्या बाजूने ४३ मते, विरोधात ० मते आणि ४ गैरहजेरी (चीन, भारत, जपान आणि रशियन फेडरेशन) असे मत पारित झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एचआरसी/आरईएस/४८/१३
या विषयावर तज्ञ बना.