एकनाथ रानडे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

एकनाथ रामकृष्ण रानडे (इंग्लिश: Eknath Ramkrishna Ranade) (१९ नोव्हेंबर, १९१४ – २२ ऑगस्ट, १९८२), ज्यांना एकनाथजीही म्हणत असत, हे भारतातील सामाजिक व आध्यात्मिक चळवळीतील एक खंदे कार्यकर्ते होते. ते आपल्या संघटनात्मक कार्यासाठी नावाजलेले होते. त्यांनी कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारकाची आणि विवेकानंद केंद्र या सामाजिक व आध्यात्मिक संस्थेची स्थापना केली.

ते शालेय जीवनापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले होते. तेंव्हापासूनच ते संघासाठी महत्त्वाचे संघटक व मार्गदर्शक बनले होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १९५६ ते १९६२ या काळात सचिवही होते. ते विवेकानंदांच्या विचारांनी भारल्या जाउन त्यांनी त्याविषयी एका पुस्तकाचे संकलनही केले.१९६३ ते १९७२ या काळात त्यांनी कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारकाची उभारणी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →