उपोसथ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

उपोसथ

बुद्धांनी शिकवले की उपोसथ दिवस म्हणजे “अशुद्ध मनाची शुद्धता” करण्याचा दिवस होय,उपोसथ किंवा उपोस्थ या शब्दाचा अर्थ उप+स्था म्हणजे एकत्र बसने होय, भिक्षुसंघाची एकसंधपणा टिकवून राहण्यासाठी उपोसथ विधी खूप महत्त्वाचा मानला गेला.उपोसथ विधी बुद्ध काळापासून अस्तित्वात (६०० ई.पू.) आहे आणि बौद्ध देशांमध्ये उपोसथ विधी श्रद्धापूर्वक पाळला जातो.

अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू पटिमोक्खा (आचारसंहितेचे नियम) यांचे पाक्षिक दोषस्वीकारणा आणि पाठ होते. या दिवशी बौद्ध उपासक आणि भन्ते धम्म अध्ययन आणि ध्यानाचे तीव्रत्व आणखी वाढवतात. बुद्धाच्या काळी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू पटिमोक्खा (आचारसंहितेचे नियम) यांचे पाक्षिक दोषस्वीकारणा आणि पाठ होत असते. विनयासंबधी जर आचारात काही दोष आला असेल तर उपोसथ दिवशी भन्ते सर्वांसमोर दोषस्वीकारणा देत असत व संघ नियमानुसार त्यांना पुढील कार्यवाहीला समोर जावे लागते. ही विधी अतिशय पवित्र मानला जायची जी आजही पाळली जाते.

धम्माप्रती बांधिलकी उपासक गृहस्थ अष्टांगिक मार्गाचे पालन करतात. धम्मा आचरणात उत्साह जागृत होण्याकरिता समाधी मार्गाचे ध्यानाचे अवलंबन करतात.जेव्हा शक्य असेल तेव्हा उपासक या दिवसाचा उपयोग स्थानिक विहारात जाण्याची संधी म्हणून करतात. या दिवशी संघाला विशेष दान अर्पण केले जाते, धम्म प्रवचन ऐकले जाते आणि रात्री उशिरापर्यंत धम्म बांधवासोबत ध्यानधारणा केली जाते. जे उपासक विहारात जाऊ शकत नाहीत अशांना आपली ध्यान करण्याचे प्रयन्त वाढवण्याची संधी उपोसथ दिवस देतो कारण या पवित्र दिवशी जगातील हजारो उपासक ध्यानधारणेचा अभ्यासात वाढ होण्याच्या दिशेने पाऊल टाकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →