युनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते.
युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर, मॅसेडोनियाच्या समाजवादी प्रजासत्ताकाने सन् १९९१ मध्ये मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक म्हणून स्वातंत्र्य घोषित केले आणि ३० एप्रिल १९९७ रोजी मॅसेडोनियाचे माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताक या नावाने युनेस्कोचे अधिवेशनास मान्यता दिली. प्रेस्पा करारानंतर, २०१९ मध्ये देशाचे नाव अधिकृतपणे उत्तर मॅसेडोनिया असे बदलण्यात आले.
सन् २०२२ पर्यंत, उत्तर मॅसिडोनियाच्या जागतिक वारसा यादीत २ स्थाने आहेत व ४ स्थाने ही तात्पुरत्या यादीत आहे.
उत्तर मॅसिडोनियामधील जागतिक वारसा स्थाने
थोडक्यात पण महत्त्वाचे.