उत्तर प्रदेश

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ वर्ग किमी एवढे आहे. हिंदी व उर्दू ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लखनौ ही उत्तर प्रदेशाची राजधानी तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे. तांदूळ, गहू, मका व डाळ ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्त्वाचे समजले जाते. उत्तर प्रदेशात सर्व धर्मांची अनेक पवित्र स्थळे आहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →