इश्क हा इंद्र कुमार दिग्दर्शित १९९७चा हिंदी भाषेतील रोमँटिक अॅक्शन विनोदी चित्रपट आहे. यात आमिर खान, अजय देवगण, जुही चावला आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर दलीप ताहिल, सदाशिव अमरापूरकर, जॉनी लीवर आणि मोहन जोशी सहाय्यक भूमिकेत आहेत.
हा चित्रपट २८ नोव्हेंबर १९९७ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. परंतु जगभरात ₹५०० दशलक्ष (US$६.६ दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई करून १९९७चा तिसरा-सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट झाला.
इश्क (हिंदी चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.