इलाही जमादार

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

इलाही जमादार (जन्म : दुधगाव-सांगली, १ मार्च १९४६, मृत्यू :३१ जानेवारी २०२१) हे एक मराठी गझलकार होते. उत्तुंग गझलकार सुरेश भटांच्या नंतर त्यांचेच नाव घेतले जाते. हा महान कवी पुण्यात एका आऊटहाऊसच्या छोट्या खोलीत राही. पुस्तकांचा आणि मांजरांचा पसारा एवढा की, खोलीत पाय ठेवायला जागा नसे. तरीही इलाहींचा प्रत्येक मित्राला घरी बोलावण्याचा आग्रह असे. खोली लहान असली तरी या कवीचे मन मोठे होते. प्रत्येक मित्राला त्यांनी मनाच्या दालनात ऐसपैस जागा दिली होती.

इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला होता. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घेत.

इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने आणि मुशायरे यांत भाग घेतला होता.. इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत आणि महाराष्ट्राबाहेरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे आणि मराठी गझलांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम होत असत. इलाही यांनी 'जखमा अशा सुगंधी' आणि 'महफिल-ए-इलाही' या नावांनी मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →