इमारी वेर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

इमारी वेर

इमारी वेर (जपानी: 伊万里焼, हेपबर्न: इमारी-याकि) ही अरिता वेअर (有田焼, अरिता याकि) प्रकारच्या चमकदार-रंगीत शैलीसाठी दिलेली एक पाश्चात्य संज्ञा आहे. जी पूर्वीच्या हिझेन प्रांतातील अरिता प्रांतात बनवलेली जपानी पोर्सिलेन भांडी होती. ही भांडी वायव्य क्युशु भागातून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली गेली. विशेषतः १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १८ व्या शतकाच्या पहिल्या सहामाहीत ही निर्यात झाली होती.



सामान्यत: इमारी वेरची भांडी अंडरग्लेज निळ्या रंगात, लाल, सोनेरी, बाह्यरेखांसाठी काळा आणि काहीवेळा इतर रंग असलेली, ओव्हरग्लेजमध्ये जोडलेले असतात. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण फुलांच्या डिझाईन्समध्ये बहुतेक पृष्ठभाग रंगीत असतो. यात असलेल्या अति सजावट करण्याची प्रवृत्तीमुळे गोंधळ होतो. ही शैली इतकी यशस्वी झाली की चीनी आणि युरोपियन उत्पादकांनी त्याची नकल करण्यास सुरुवात केली. कधीकधी काकीमॉन आणि कुटानी वेअरच्या वेगवेगळ्या ओव्हरग्लेज शैली देखील इमारी वेअर अंतर्गत गटबद्ध केल्या जातात.

हे नाव इमारी, सागा या बंदरावरून आले आहे. येथून ते नागासाकी येथे पाठवण्यात आले होते. जिथे डच ईस्ट इंडिया कंपनी आणि चिनी लोकांच्या व्यापाराच्या चौक्या होत्या. पश्चिमेमध्ये बहु-रंगीत किंवा "एनामेल्ड" वस्तू "इमारी वेअर" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या होत्या. आणि वेगळ्या गटाच्या काकीमॉन, तर निळ्या आणि पांढऱ्या वस्तूंना "अरिता वेअर" असे म्हणत होते. किंबहुना हे प्रकार अनेकदा एकाच भट्ट्यांवर तयार केले जात होते. आज, वर्णनकर्ता म्हणून "इमारी"चा वापर कमी झाला आहे आणि त्यांना बऱ्याचदा अरिटा वेअर्स (किंवा हिझेन वेअर्स, जुन्या प्रांतानंतर) म्हणले जाते. इमारी वेअरची नक्कल चीन आणि युरोप या दोन्ही देशांमध्ये केली गेली आणि आजपर्यंत ती सतत तयार केली जात आहे.



"सुरुवातीचे इमारी" (शोकी इमारी) हा एक पारंपारिक आणि काहीसा गोंधळात टाकणारा शब्द आहे. तो १६५० च्या आधी अरिताच्या आसपास बनवलेल्या अगदी भिन्न वस्तूंसाठी वापरला जातो. देशांतर्गत बाजारपेठेसाठी पोर्सिलेन सामान्यत: लहान आणि विरळपणे अंडरग्लॅझ निळ्या रंगात रंगवलेले असतात. परंतु काही मोठ्या हिरव्या सेलेडॉन डिशेस देखील आहेत. जे वरवर पाहता आग्नेय आशियाई बाजारासाठी पोर्सिलेनियस स्टोनवेअरमध्ये बनवले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →