इब्न खल्दुन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

इब्न खल्दुन

अबू झैद अब्द अर-रहमान इब्न मुहम्मद इब्न खल्दुन अल-हद्रमी तथा इब्न खल्दुन (२७ मे, १३३२ – १७ मार्च, १४०६) हे एक अरब विद्वान, इतिहासकार, तत्त्वज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होते. त्यांना मध्ययुगातील महान समाजशास्त्र तज्ज्ञांपैकी एक मानले जाते.

मुकद्दीमा (प्रस्तावना) हे त्यांचे पुस्तक सर्वात प्रसिद्ध आहे. आत्मचरित्रात्मक असलेले हे पुस्तक त्यांनी फक्त सहा महिन्यांत लिहून काढले होते. त्यांच्या सिद्धांतांचा प्रभाव १७ व्या आणि १९ व्या शतकातील कातिब चेलेबी, मुस्तफा नइमा आणि अहमद जेवदत पाशा यांसारख्या ओस्मानी साम्राज्यकालीन इतिहासकारांवर पडला होता. इब्न खल्दुन यांना एक प्रमुख मुस्लिम आणि अरब इतिहासकार मानले जाते. अलीकडच्या काळात त्यांच्या कार्याची तुलना निकोलो मॅकियावेली, डेव्हिड ह्यूम, कार्ल मार्क्स आणि ॲडम स्मिथ यांसारख्या प्रभावशाली पाश्चात्य तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांशी केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →