इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केन्या, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
इथियोपिया हा जगातील सर्वांत प्राचीन देशांपैकी एक व आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. आफ्रिकेतील सर्वाधिक जागतिक वारसा स्थाने ह्याच देशात आहेत.
इथियोपिया
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.