इगतपुरी विधानसभा मतदारसंघ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ - १२७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार इगतपुरी मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. त्र्यंबेश्वर तालुका आणि २. इगतपुरी तालुक्यातील धारगांव, वाडीव-हे, घोटी, इगतपुरी ही महसूल मंडळे आणि इगतपुरी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. इगतपुरी हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हिरामण भिका खोसकर हे इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →