इंद्राणी रॉय (५ सप्टेंबर, १९९७ - ) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ती स्पर्धांमध्ये झारखंड महिला क्रिकेट संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते.
रॉयने वयाच्या १५ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ती महेंद्रसिंग धोनीला तिचे प्रेरणास्थान मानते. २०१४ मध्ये झारखंडशी करार करण्यापूर्वी ती चार वर्षे बंगाल १९ वर्षांखालील संघासाठी खेळली. २०२०-२१ हंगामात रॉयने वरिष्ठ महिला एकदिवसीय लीगमध्ये दोन नाबाद शतके केली. आठ सामन्यांमध्ये ४५६ धावा करीत ती स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.
मे २०२१ मध्ये रॉयची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली. यांतील कसोटी, महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी कोणत्याच सामन्यात तिची वर्णी खेळणाऱ्या संघात लागली नाही सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्याबद्दल तिने निराशा व्यक्त केली.
इंद्राणी रॉय
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.