इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड ही एक भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे. जी बी2सी, बी2बी आणि किरकोळ ग्राहकांना वेब पोर्टलद्वारे उत्पदनांची विक्री सेवा प्रदान करते. या समुहाची सुरुवात १९९६ मध्ये दिनेश अग्रवाल व ब्रिजेश अग्रवाल यांनी केली. यांनी IndiaMART.com ही संकेतस्थळ स्थापना केली या मागे एका व्यवसायिकाला भारतीय उत्पादकाशी थेट जोडण्यासाठी हे पोर्टल बनवली. या कंपनीचे मुख्यालय नोएडा, उत्तर प्रदेश, भारत येथे आहे.
इंडियामार्ट संकेतस्थळाला २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे ३२.५ कोटी, ५५.२ कोटीआणि ७२.३ कोटी लोकांनी भेट दिली होती. त्यापैकी २०.४ कोटी, ३९.६ कोटी आणि ५५ कोटी लोकांनी मोबाईल वापरून याला भेट दिली होती. ही एकूण रहदारीच्या अनुक्रमे ६३%, ७२% आणि ७६% आहे. सध्या इंडियामार्टच्या ॲपचे अँड्रॉइडवर ४.७ चे रेटिंग आहे आणि १ कोटी पेक्षा जास्त डाउनलोड आहेत.
एंजल ब्रोकिंग च्या मते आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ₹२० कोटी रुपये निव्वळ नफा होता आणि महसूल ५०७ कोटी रुपयांची होती. आर्थिक वर्ष २०१४ ते २०१९ मध्ये २९% सीएजीआर नोंदणीकृत होती. यात शून्य कर्ज आणि मोठ्या प्रमाणात रोख शिल्लक दिसून येते. ३१ मार्च २०१९ पर्यंत कंपनीकडे 8.27 कोटी नोंदणीकृत खरेदीदार होते आणि त्यांच्याकडे भारतात ५५.५ लाख पुरवठा करणारे स्टोफ्रॉन्ट्स होते आणि पुढील दोन वर्षात २९ टक्के वाढीचा वार्षिक वाढ दर (सीएजीआर) ठेवण्याची अपेक्षा आहे.
२०१६ आणि २०१९ मध्ये इंडियामार्टने प्रॉकमार्ट आणि व्यापर या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात आयपीओ सुरू करणारी इंडियामार्ट ही पहिली कंपनी होती.
इंडियामार्ट
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.