आल्फ्रेड हिचकॉक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

आल्फ्रेड हिचकॉक

सर आल्फ्रेड जोसेफ हिचकॉक (ऑगस्ट १३, इ.स. १८९९ - एप्रिल २९, इ.स. १९८०) हा इंग्लिश भाषक चित्रपटांचा ब्रिटिश दिग्दर्शक व निर्माता होता. रहस्यपटांतील व मानसशास्त्रीय भयपटांतील नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी तो ओळखला जातो. युनायटेड किंग्डम या त्याच्या मायदेशात मूकपटांमधील व बोलपटांमधील यशस्वी कारकिर्दीनंतर हिचकॉक अमेरिकेतील हॉलिवुड चित्रपटसृष्टीत गेला. ब्रिटिश नागरिकत्व अबाधित राखून इ.स. १९५६ साली तो अमेरिकेचा नागरिक बनला.

आपल्या ५० वर्षाहून दीर्घ कार्यकालावधीत हिचकॉकने स्वतःची एक वेगळ्या व लक्षणीय दिग्दर्शन शैलीसाठी म्हणून ओळख करून घेतली. त्याने कॅमेरा कलाकाराच्या नजरेचा वेध घेईल अशा प्रकारे कॅमेरा वापरण्याची एक नवीन पद्धत अस्तित्वात आणली ज्यामुळे प्रेक्षकांना खाजगीतील दृश्य बघितल्यासारखे वाटेल. प्रेक्षकांची उत्कंठा, भीती किंवा जवळीक ताणावी अशी दृश्ये तो निवडी आणि त्यांचे नवनवीन तऱ्हेने संकलन करी. त्याच्या गोष्टीत बऱ्याचदा कायद्याच्या कचाट्यातून दूर पळणारा पुरुष एका सुंदर बाईसोबत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →