आयसीसी पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

आयसीसी पुरुषांची टी२०आ संघ क्रमवारी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेट क्रमवारी प्रणाली आहे. प्रत्येक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामन्यानंतर, सहभागी दोन संघांना गणितीय सूत्रावर आधारित गुण मिळतात. प्रत्येक संघाच्या एकूण गुणांना रेटिंग देण्यासाठी एकूण सामन्यांच्या संख्येने भागले जाते आणि सर्व संघांना रेटिंगच्या क्रमाने टेबलवर रँक केले जाते. क्रमवारीत टिकण्यासाठी संघांनी मागील तीन ते चार वर्षांत किमान सहा टी२०आ सामने खेळलेले असणे आवश्यक आहे.

भारत सध्या आयसीसी पुरुषांच्या टी२०आ संघ क्रमवारीत आघाडीवर आहे, हे स्थान त्यांनी २१ फेब्रुवारी २०२२ पासून सांभाळले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →