आयर्लंडचे प्रजासत्ताक

या विषयातील रहस्ये उलगडा.

आयर्लंडचे प्रजासत्ताक

आयर्लंडचे प्रजासत्ताक (आयरिश: Poblacht na hÉireann), हा उत्तर युरोपामधील एक देश आहे. हा सार्वभौम देश आयर्लंडच्या बेटाचा पाच षष्ठांश भाग व्यापतो. आयर्लंडच्या बेटाचे आयर्लंडचे प्रजासत्ताक व उत्तर आयर्लंड या दोन भागांत मे ३, इ.स. १९२१ रोजी विभाजन झाले. या देशाच्या उत्तरेस उत्तर आयर्लंड (युनायटेड किंग्डमचे राज्य), पश्चिमेस अटलांटिक महासागर, पूर्वेस आयरिश समुद्र, दक्षिणेस केल्टिक समुद्र, आग्नेयेस सेंट जॉर्ज खाडी आहे. 'आयर्लंडचे प्रजासत्ताक' हे या देशाचे जरी घटनात्मक दृष्ट्या अधिकृत नाव असले तरीही 'आयर्लंड' हे नाव प्रचलित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →