आयर्न मॅन

या विषयातील रहस्ये उलगडा.

आयर्न मॅन

आयर्न मॅन हा मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारा एक सुपरहिरो आहे. लेखक-संपादक स्टॅन ली यांनी सह-निर्मित केलेले हे पात्र लॅरी लिबर यांनी विकसित केले आणि डॉन हेक आणि जॅक किर्बी या कलाकारांनी डिझाइन केले. हे पात्र प्रथम टेल्स ऑफ सस्पेन्स #३९ (१९६८) मध्ये दिसले. या पात्राने थॉर, अँट-मॅन, वॅस्प आणि हल्क सोबत ॲव्हेंजर्स सुपरहिरो संघाची स्थापना केली.

एक श्रीमंत अमेरिकन व्यवसायिक, प्लेबॉय, परोपकारी, संशोधक आणि कल्पक शास्त्रज्ञ असलेल्या अँथनी एडवर्ड "टोनी" स्टार्कला अपहरणाच्या वेळी छातीत गंभीर दुखापत झाली. त्याचे अपहरणकर्ते त्याला सामूहिक संहाराचे शस्त्र तयार करण्यास भाग पाडतात. पण त्याऐवजी तो आपला जीव वाचवण्यासाठी आणि बंदिवासातून सुटण्यासाठी चिलखतीचा एक यांत्रिक सूट तयार करतो. नंतर स्टार्क त्याचा सूट विकसित करतो, त्यात तो त्याची कंपनी, स्टार्क इंडस्ट्रीजद्वारे डिझाइन केलेली शस्त्रे आणि इतर तांत्रिक उपकरणे जोडतो. आयर्न मॅन म्हणून जगाचे रक्षण करण्यासाठी तो सूट आणि क्रमिक आवृत्त्या वापरतो. सुरुवातीला आपली खरी ओळख लपवून ठेवली तरी अखेरीस स्टार्क स्वतःला आयर्न मॅन जाहीर करतो.

सुरुवातीला स्टॅन लीने आयर्न मॅनचा वापर शीतयुद्धाच्या थीमसाठी, विशेषतः साम्यवादाविरोधी लढ्यात अमेरिकन तंत्रज्ञान आणि उद्योगाची भूमिका शोधण्यासाठी केला. पुढे आयर्न मॅनच्या पुनर्कल्पना समकालीन गोष्टींकडे वळल्या.

आयर्न मॅनच्या विविध कॉमिक पुस्तक मालिका तयार केल्या गेल्या आहेत. या पात्राच्या बहुतेक प्रकाशन इतिहासामध्ये तो अ‍ॅव्हेंजर्सचा संस्थापक सदस्य आहे.

आयर्न मॅनला अनेक अ‍ॅनिमेटेड दूरदर्शन कार्यक्रम आणि चित्रपटांसाठी रुपांतरित केले गेले आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये, आयर्न मॅन (२००८), द इनक्रेडिबल हल्क (२००८), आयर्न मॅन २ (२०१०), द अ‍ॅव्हेंजर्स (२०१२), आयर्न मॅन ३ (२०१३), अ‍ॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वार (२०१६), स्पायडर मॅन: होमकमिंग (२०१७), ॲव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), आणि ॲव्हेंजर्स: एंडगेम (२०१९) या चित्रपटांमध्ये टोनी स्टार्कची भूमिका रॉबर्ट डाउनी जूनियर यांनी केली होती. मिक विंगर्टने व्हाट इफ...? (२०२१) या अ‍ॅनिमेटेड मालिकेतील पात्राला आवाज दिला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →