आयरीन व्हान झिल (२७ नोव्हेंबर, १९८४ - ) ही नामिबियाची क्रिकेट खेळाडू आणि नामिबिया महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार आहे.
तिने १ एप्रिल २०१९ रोजी बोत्सवानाच्या नामिबिया दौऱ्यात बोत्सवाना विरुद्ध नामिबियासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.
ऑगस्ट २०१९ मध्ये, स्कॉटलंडमधील २०१९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेसाठी तिला नामिबियाच्या संघात स्थान देण्यात आले. ती ३१ ऑगस्ट २०१९ रोजी आयर्लंडविरुद्ध नामिबियाच्या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यात खेळली. मे २०२१ मध्ये, तिची रवांडा येथे २०२१ क्विबुका महिला टी-२० स्पर्धेसाठी नामिबियाच्या संघाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आयरीन व्हान झिल
थोडक्यात पण महत्त्वाचे.