आउश्वित्झ छळछावणी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

आउश्वित्झ छळछावणी

आउश्वित्झ छळछावणी (मराठी लेखनभेद: ऑश्विझ छळछावणी) पोलंडमधील ओश्फिन्चिम ह्या शहराजवळ नाझी जर्मनीने उभारलेली एक मोठी छळछावणी होती. अजूनही येथे तत्कालीन छळछावणीचे अवशेष जतन केले आहेत व छळछावणीत हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मारक आहे. या ठिकाणी शेकडो ज्यू, युद्धबंदी, पकडलेले हेर, राजकीय विरोधक यांना बंदी करून ठेवण्यात आले होते. त्यांचा मुख्य उपयोग युद्धकालात सामग्री उत्पादनासाठी लागणारे कामगार म्हणून केला गेला. जे श्रम करण्यास सक्षम होते, अश्यांनाच जिवंत ठेवले जाई. इतर लोकांना विविध प्रकारे ठार मारले जाई. विषारी वायूंच्या कोठडीमध्ये कोंडून ठार मारण्याची जागा अवशेषात जतन केली आहे.येथे ११ लाख व्यक्तींना ठार मारले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →