आंबडवे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील एक छोटे गाव आहे. हे गाव मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणापासून १७ किलोमीटर अंतरावर आहे. इथे पुण्याच्या अशोक सर्वांगीण विकास संस्थेने अशोक स्तंभ आणि शिलालेख उभारून त्याला स्फूर्तिभूमी असे नाव दिले आहे. आंबडवे हे बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव होय. हे गाव खासदार अमर साबळे यांनी त्यांच्या विकास योजनेत सामील केले आहे. येथे विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, जे एक पंचतीर्थ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंबडवे
थोडक्यात पण महत्त्वाचे.