आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१४

यामागील विज्ञान आणि इतिहास.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१४

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक २०१४ ही भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ७ मे २०१४ रोजी एकाच घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये आंध्र प्रदेश विधानसभेमधील सर्व १७५ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्य वेगळे केल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवली गेली.

२०१४ लोकसभा निवडणुकांच्या सोबतच घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीत एन. चंद्रबाबू नायडूंच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम पक्षाने १०६ जागांवर विजय मिळवून जोरदार प्रदर्शन केले व आंध्र प्रदेशाच्या राजकीय पतलावर तब्बल १० वर्षांनी पुनरागमन केले. ह्याच काळात घेण्यात आलेल्या पहिल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव स्वतंत्र तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री बनले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →