२०१८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोसम मे २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत आहे. या मोसमात १६ कसोटी सामने, २७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३२ टी२० सामने खेळविण्यात येणार आहेत. मोसमाची सुरुवात भारत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल, इंग्लंड एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल आणि पाकिस्तान टी२० अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर असताना झाली. तर ऑस्ट्रेलिया महिला महिला क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहिल्या. हा मोसम आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या (आयसीसी) २०१८-२३ एफ.टी.पी अंतर्गत सुरू झाला. एप्रिल २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाेने घेतलेल्या निर्णयामुळे जुलै २०१८ पासून सर्व सदस्य देशांना (महिला) टी२० आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला असून २०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रताच्या स्पर्धेतील महिला सामन्यांना आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा असेल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८
या विषयावर तज्ञ बना.