अस्मितादर्श हे औरंगाबादहून प्रसिद्ध होणारे एक त्रैमासिक आहे. दलित साहित्य, दलित चळवळीला एक दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य 'अस्मितादर्श'ने केले. गंगाधर पानतावणे यांनी हे त्रैमासिक सुरू केले. डिसेंबर १९६७ ला 'अस्मितादर्श'चा पहिला अंक प्रकाशित झाला. मजकूर गोळा करण्यापासून ते प्रुफ तपासण्यापर्यंत व अंक छापून आल्यावर त्याला रॅपर चिकटवून त्यावर पत्ते टाकण्यापर्यंत सर्व कामे पानतावणे हे एकट्याने करत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अस्मितादर्श (त्रैमासिक)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.