असीस कौर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

असीस कौर

असीस कौर (जन्म २६ सप्टेंबर १९८८) ही एक भारतीय गायिका आहे. तिने इंडियन आयडॉल आणि आवाज पंजाब दी यासह विविध गायन रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. २०२१ मध्ये, तनिष्क बागचीसह शेरशाह चित्रपटामधील तिचे "रातां लंबियां" हे गाणे खूप हिट झाले. तिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत ज्यात २ फिल्मफेर पुरस्कार आणि एक आयफा पुरस्कार यांचा यांचा समावेश आहे. २०२१ व २०२२ मध्ये तिने लागोपाठ फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार जिंकला. ("हुई मलंग", मलंग चित्रपट आणि "रातां लंबियां", शेरशाह चित्रपट)

कौरला खूप लहान वयातच पार्श्वगायिका बनण्याची इच्छा होती. तिने वयाच्या ५ व्या वर्षी गुरबानी गायला सुरुवात केली. तिने तमंचे चित्रपटाच्या "दिलदारा (रिप्राइज)" या सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, तिने केसरी मधील "वे माही", ड्राइव्ह मधील "मखना", सिंबा मधील "बंदेया रे बंदेया" आणि "तेरे बिन", लवयात्री मधील "अख लड जावे" आणि "चोघाडा" आणि कपूर अँड सन्स मधील "बोलना" यासह अनेक बॉलीवूड गाण्यांवर विविध संगीतकारांसोबत काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →