अल्झायमर रोग

या विषयातील रहस्ये उलगडा.

अल्झायमर रोग

अल्झायमर रोग (इंग्रजी : Alzheimer's disease) हा मेंदू चा आजार आहे. हा मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट करतो आणि कालांतराने गंभीर होतो.

अल्झायमर (इंग्रज़ी : Alzheimer's Disease) रोग 'विसरण्याचा आजार'आहे. याचे नाव अलाॅईस अल्झायमरवरून ठेवले आहे त्यानेच सर्वात आधी या रोगाचे विवरण केले. या आजाराच्या लक्षणात स्मरणशक्ती नष्ट होते. शिवाय, निर्णय घेण्यात असमर्थ असणे, बोलण्यास अडचण येणे आणि यामुळे सामाजिक आणि पारिवारिक समस्यांची गंभीर स्थिति होणे इत्यादी होते. रक्तदाब, मधुमेह, आधुनिक जीवनशैली आणि डोक्याला अनेकवेळा मार लागणे हे आहे. मार लागल्याने या आजाराचे प्रमाण वाढण्याची आशंका वाढते. ६० वर्षे वयाच्या जवळपास वय असणाऱ्या लोकांमध्ये या आजार उद्भवू शकतो. या आजारावर काही स्थायी उपाय नाही.

.

आजाराच्या सुरुवातीला नियमित तपासणी आणि उपचाराने नियंत्रण ठेवू शकतो. मस्तिष्कच्या स्नायूंच्या क्षरणाने पेशंटच्या बौद्धिक क्षमता आणि व्यावहारिक लक्षणांत पण फरक पड़तो.

माणूस जसजसा म्हातारा होत जातो तसतशी त्याची विचार करण्याची आणि स्मरणाची क्षमतापण कमजोर होत जाते. पण याचे गंभीर होणे अल्झायमरचे सुरुवातीचे लक्षण आहे. मेंदूमध्ये शंभर अब्ज कोशिका (न्यूरॉन) असतात. प्रत्येक कोशिका अन्य कोशिकांबरोबर संवाद करून एक नेटवर्क बनवते. या नेटवर्कचे काम विशेष असते. काही विचार करतात, काही शिकतात आणि काही स्मरणात ठेवतात, तर अन्य कोशिका आपल्याला ऐकण्यासाठी, वास घेण्यासाठी इत्यादींमध्ये मदत करतात.

यांव्यतिरिक्त काही कोशिक माणसाच्या मांसपेशींना काम करण्याचे आदेश देतात.

आपले काम करण्यासाठी मेंदूच्या कोशिका लघु उद्योगासारखे काम करतात. त्या पुरवठा घेतात व ऊर्जा निर्माण करण्यात मदत करतात. अवयवांची निर्मिती करतात आणि बेकार वस्तूंना बाहेर काढतात. कोशिका सूचनांना जमा करतात आणि मग त्यांचे प्रसंस्करणपण करतात. शरीर काम करत रहावे म्हणून समन्वयायाबरोबरच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि इंधनाची गरज असते. अल्झायमर या रोगात कोशिकांचा काही हिस्सा काम करणे बंद करतो, त्यामुळे इतर कामांवरही प्रभाव पडतो. कोशिकांमध्ये काम करण्याची ताकद कमी होत जाते आणि अंततः त्या मरतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →