सर अलेक्झांडर कनिंगहॅम (२३ जानेवारी, इ.स. १८१४ – २८ नोव्हेंबर, इ.स. १८९३) हा भारताच्या पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा पहिला महानिदेशक होता. या पदावर त्याची नेमणूक इ.स. १८६१ साली करण्यात आली होती. ह्यू एन त्संगच्या लिखाणाचा आधार घेऊन त्याने प्राचीन बौद्ध स्थळांचे समन्वेषण करून सारनाथ, सांची इत्यादी ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खनने केली. प्राचीन भारतीय भूगोल (इ.स. १८७१), अशोकाचे लेख (इ.स. १८७७), प्राचीन भारतीय नाणी (इ.स. १८९१) इत्यादी महत्त्वाची पुस्तके त्याने लिहिली. शिवाय त्याच्या खात्याच्या वतीने त्याने अनेक महत्त्वपूर्ण वार्षिक वृत्तान्त प्रसिद्ध केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलेक्झांडर कनिंगहॅम
या विषयातील रहस्ये उलगडा.