इलेक्ट्रिकल अर्थिंगसाठी जमिनीमध्ये साधारणत: ५ ते ८ फुटांपर्यंत खड्डा खणून त्यामध्ये एक १’x१’ आकारमानाची १’’ जाडीची तांब्याची किंवा बिडाची प्लेट बसवितातव व. त्या प्लेटच्या सभोवताली कोळसा, मीठ, अर्थिंग पावडर टाकतात, व खड्डा भरून टाकततात. या क्रियेस ‘अर्थिग’ करणे असे म्हणतात.जमिनीमध्ये पुरलेल्या प्लेटपासून तांब्याची एक जाड तार बाहेर काढलेली असते. या तारेस ‘अर्थिगची तार’ म्हणतात. अर्थिग केलेल्या जागेच्या आसपास ओलावा राहील, अशी खबरदारी घेतली जाते. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या धातूच्या भागास शॉक बसू नये. याकरिता उपकरणांच्या धातूच्या भागास अर्थिग करतात. म्हणजे जमिनीतील अर्थिगपासून निघालेली तांब्याची तार उपकरणाच्या धातूच्या बाह्य भागास जोडली जाते. त्यासाठी उपकरणाला वीज पुरवणाऱ्या इलेक्ट्रिक प्लगमध्ये 'लाईव्ह' आणि “न्यूट्रल'खेरीज एक तिसरी जाड पिन असते. काही वेळा उपकरणांच्या धातूच्या भागाशी अपघाताने कनेक्शनची वायर चुकून थोडासा स्पर्श करते. अश्या वेळेस 'प्यूज' जाऊन वीजप्रवाह खंडित होतो, आणि अपघात टळतो.
लाईव्ह वायर आणि अर्थिंग वायर यांच्यामधील व्होल्टेजचा फरक २ व्होल्टपेक्षा जास्त असू नये, अशी काळजी घेतली जाते.
अर्थिंग
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.