अमित बेहल

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अमित बेहल

अमित बेहल हे एक भारतीय नाट्य, दूरदर्शन आणि चित्रपट अभिनेते आहेत. बेहल यांनी १९९४ मध्ये भारताच्या पहिल्या दैनिक मालिका शांतीमधील भूमिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर त्यांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, पंजाबी आणि उर्दू भाषांमध्ये टीव्ही मालिका केल्या. त्यांनी झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिका, झी टीव्हीवरील बुद्धा, आणि लाइफ ओके मालिका सावित्री - एक प्रेम कहानी मध्ये भूमिका साकारल्या आहेत.

त्यांनी चक्रवर्ती अशोक सम्राट आणि प्रधानमंत्री यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. कलर्स टीव्हीवरील बालाजी टेलिफिल्म्स फिक्शन डेली सोप ऑपेरा कसम तेरे प्यार की मध्ये देखील पाहिले आहे. कलर्स टीव्हीवरील इश्क में मरजावां या मालिकेत त्याने रणजीतप्रताप सिंगची भूमिका साकारली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →