अनैच्छिक ब्रम्हचर्य- (english: incelhood, inceldom) इंग्रजीत Involuntary Celibacy किंवा इंसेल म्हणजे ऐच्छिक ब्रम्हचर्य,अलैंगिकता,लैंगिक विरोध,लैंगिक वर्जन ह्या कारणांन व्यतिरिक्त, स्वेच्छे विरुद्ध असेलला लैंगिक आणि घनिष्ट संबंधांचा आभाव. इंसेल ह्या संज्ञेत असे लोक येतात, जे लैंगिक संबंध आणि संभाव्य नात्यांबाबत प्रवृत्त असूनही आपल्या उद्दिष्टाप्रत क्वचित पोहोचू शकतात किंवा अजिबात पोहोचू शकत नाहीत.
अनैच्छिक ब्रम्हचर्य ह्या संकल्पनेत ब्रह्मचर्याच्या इतर प्रकारांत भेद करणाऱ्या दोन विशेष लक्षणांचा समावेश होतो:पहिले म्हणजे त्यात एक अशी अर्ध-शाश्वत विशेष स्थिती होते, ज्यात व्यक्तीने लैंगिक साथीदार शोधण्यासाठी स्वतः बद्दलचे लैंगिक अपील आणि सामाजिक कौशल्य सुधारण्यात लक्षपूर्वक परिश्रम घेऊनही सुधारणा होत नाही. दुसरे, अनैच्छिक ब्रम्हचारी व्यक्ती संपूर्ण किंवा जवळ जवळ संपूर्ण घनिष्ट शारीरिक संबंधापासून खुपं मोठा काळ रिते असतात -केवळ आठवडे किंवा महिने नसून अनेक वर्ष किंवा दशकं - आणि अश्या संध्यांपासुनही पूर्ण किंवा संपूर्ण रिक्त राहतात. अश्यानी "लैंगिक अनुभवातून" परिस्थिती सुधारणे अशक्य होते.
अनैच्छिक ब्रम्हचर्य भोगणाऱ्या व्यक्तींची विशेष अडचण अशी असते की, परिस्थितीची कारणे बहिर वैयक्तिक गुणधर्मांनुसार समजावता येत नाहीत - संशोधकांनी केलेल्या लोकांच्या चौकशीनुसार, बहुतेक अनैच्छिक ब्रम्हचारी, शारीरिक दृष्ट्या विशेष अनाकर्षणीय नसतात, आणि इतर बरोबरीच्या अनैच्छिक ब्रम्हचरी नसलेल्या व्यक्तींसारखेच असतात. जरी अनैच्छिक ब्राम्हचाऱ्यांच्या लोकसंख्येत केवळ काही किरकोळ प्रमाणातील व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात स्पष्ट बाधा असतात ज्यामुळे त्या व्यक्ती वर्तमान आणि भविष्यातील लैंगिक सांध्यांना मुकतात, तरी जे काही तुरळक संशोधन ह्या विषयावर झालेले आहे, त्यावरून असे दिसून येते की एकूण अनैच्छिक ब्राम्हचारी लोकसंख्या ही सामाजिक दृष्ट्या सामान्य आणि सुधृड व्यक्तींची आहे. ह्यांच्यात लैंगिक अभाव कोणत्या असहायातेतून आलेला नसून, उलट लैंगिक संबंधांच्या अभावातून ह्यांना असहायता आलेली असते. ह्या मुळे आंतरिक आणि बहिर त्रुटींवर उपचार करणाऱ्या नेहमीच्या मानसशास्त्रीय पद्धतींनी ह्या व्यक्तींची अडचण सोडवणे अतिशय कठीण होऊन बसते.
जरी इंटरनेटवर ह्या विषयासंबंधी काही आधारगट आणि चर्चामंडळे असली तरी, अनैच्छिक ब्रम्ह्चर्यामागिल कारणांत असलेली वैविध्यता आणि कठीणता(कधी काही बाबतीत काहीही "कारण" आढळून येत नाही) लक्षात घेता, इतर लैंगिक त्रुटींवर उपलब्ध असलेल्या उपचारांसारखी कोणतीही सर्वमान्य व्यक्तिमत्व विकास आणि परिस्थिती सुधारणा पद्धती उपलब्ध नाही. आणि, ही अनैच्छिक ब्रम्हचर्याची परिस्थिती शाश्वत असल्याकारणाने, नुसते एकदा वेश्येकडे जाऊन लैंगिक अनुभव घेणे हा दीर्घकालीन उपाय म्हणून पुरेसा पडत नाही. असे केल्याने मात्र स्वतःला लैंगिक रोगांच्या जोखीमेत टाकण्यासारखे होते.
अनैच्छिक ब्रह्मचर्य
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.