अनुभव हा प्रसिद्ध दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचा १९७१ चा हिंदी भाषेतील चित्रपट असून त्यात संजीव कुमार, तनुजा आणि दिनेश ठाकूर यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बासू बट्टाचार्य यांच्या शहरी वातावरणातील वैवाहिक मतभेदावरील आत्मनिरीक्षण या विषयावरील तीन चित्रपटांमधील पहिला भाग होता, ज्यात अविष्कार (१९७३) आणि गृह प्रवेश (१९७९) हे होते. ह्या चित्रपटाला १९७२ चा द्वितीय सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि नंतर मुख्य प्रवाहातील सिनेमाने देखील हा विषय उचलला. पार्श्वगायिका गीता दत्त यांच्या गुलजारच्या गाण्यांसह संगीत दिग्दर्शक कनू रॉय यांनी संगीतबद्ध केलेल्या "मेरी जान मुझे जान ना कहो", "कोई चुपके से आके" आणि "मेरा दिल जो मेरा होता" यासारख्या उत्कृष्ट गाण्यांसाठीही हा चित्रपट लक्षात ठेवला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनुभव (चित्रपट)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.