अनुग्रह नारायण सिन्हा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अनुग्रह नारायण सिन्हा

अनुग्रह नारायण सिन्हा (१८ जून १८८७ - ५ जुलै १९५७), बिहार विभूती म्हणून ओळखले जाणारे, एक भारतीय राष्ट्रवादी राजकारणी होते. ते चंपारण सत्याग्रहात सहभागी होते. ते गांधीवादी आणि आधुनिक बिहारच्या शिल्पकारांपैकी एक होते, जे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते.त्यांनी बिहार राज्याचे अर्थमंत्री (१९४६-१९५७) म्हणून पण काम केले. ते भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते, जे भारताचे संविधान लिहिण्यासाठी निवडले गेले होते आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिल्या संसदेत त्यांनी काम केले होते. त्यांच्याकडे कामगार, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक बांधकाम, पुरवठा आणि किंमत नियंत्रण, आरोग्य आणि कृषी यासह विविध विभागांची जबाबदारी होती. ते स्वातंत्र्य चळवळीदरम्यान महात्मा गांधी यांचे जवळचे सहकारी होते आणि बिहारमधील गांधीवादी चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी बिहार केसरी श्रीकृष्ण सिन्हा यांच्यासोबत काम केले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यानंतर बिहारमधील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आघाडीच्या राष्ट्रवादींपैकी ते एक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →