अचानक हा १९७३ चा भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे, जो गुलजार दिग्दर्शित आहे, ख्वाजा अहमद अब्बास लिखित आणि विनोद खन्ना अभिनीत आहे. या चित्रपटासाठी गुलजार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेर नामांकन मिळाले. गुलजार हे निपुण गीतकार असले तरी या चित्रपटात एकही गाणी नव्हती. अब्बास यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेर नामांकन मिळाले.
हा चित्रपट वास्तविक जीवनातील १९५८ मधील खळबळजनक के.एम. नाणावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य या न्यायालयीन प्रकरणावरून प्रेरित आहे. १९६३ मधला ये रास्ते हैं प्यार के हा चित्रपटही याच प्रकरणावर आधारित होता. अक्षय कुमारचा २०१६ चा रुस्तम चित्रपट देखील याच केसवर आधारित आहे.
चित्रपटात गाणी नव्हती व पार्श्वसंगीत वसंत देसाई यांनी केले आहे.
अचानक (१९७३ चित्रपट)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.