अगस्ता

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अगस्ता

अगस्ता किंवा हादगा (शास्त्रीय नाव: Sesbania Grandiflora, सेस्बानिया ग्रॅंडिफ्लोरा) हा दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा वृक्ष आहे. कुळ फॅबेसी याला अगस्ती किंवा अगस्ता या नावानेही ओळखले जाते. या वृक्षाची वाढ झटपट होते. याचे आयुर्मान तीन ते साडेतीन वर्ष इतके असते व उंची जवळपास १५ ते ३० फुटांपर्यंत असते. ही झाडे देवळांजवळ लावली जातात. तसेच शेताच्या बांधावर यांची लागवड केली जाते. या झाडाला पांढरी, पिवळट-पांढरी किंवा लालसर रंगाची फुले येतात. ही फुले देवाला वाहतात. फुलांची भाजी करतात. या झाडाच्या फुलांचा, पानांचा व सालीचा औषधी उपयोग केला जातो. झाडाच्या पानांचा जनावरांना चारा म्हणून, तर झाडाचे लाकूड शेतीची अवजारे तयार करण्यासाठी उपयोगास येते. आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठीही यांचा उपयोग होतो. हादग्याच्या पानाची व फुलाची भाजी करतात. हादग्याची फुले पांढऱ्या रंगाची असतात.ही वनस्पती प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये विपुल प्रमाणात आढळून येते. हे झाड मध्यम उंचीचे असते.

इतर नावे :



संस्कृत - अगस्त्य, मुनिद्रुम, कुंभयोनि

मराठी - अगस्ती, अगस्त्याचा पाला

हिंदी भाषा - अगस्ता, बाक, बासना, हतिया

कानडी - अगासे, केपागसे

गुजराती - अगाथियो

तमिळ - अगत्ति कीरै (அகத்தி கீரை)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →