अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा

"महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013",हा एक क्रांतिकारी कायदा आहे. या कायद्याचे संपूर्ण Drafting (शब्द न् शब्द लिखाण) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अ.भा.अंनिस -स्थापना 1882) चे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी केले.

याच संदर्भाततला व असाच कायदा अंधश्रद्धा विरोधी कायदा सन 2003 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(महा अंनिस स्थापना - 1989) चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर (1945-2013) यांनी तयार केलेला आहे.

वर्षानुवर्षे बंदी घातलेल्या क्रियांची संख्या सतत कमी केली जात होती. दाभोलकर यांच्या हत्येनंतर, 26 ऑगस्ट 2013 रोजी हे विधेयक मांडण्यात आले आणि नागपूरच्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2013 मध्ये ते औपचारिकपणे मांडले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →