अंतःस्रावी ग्रंथी

या विषयावर तज्ञ बना.

अंतःस्रावी ग्रंथी

अंतःस्रावी ग्रंथी(एंडोक्रायीन) बाह्यकोशीय संकेतांद्वारे अंतरस्रावचा (हार्मोन) स्राव करतात व उत्पन्न होणारा स्त्राव वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम रक्तातच मिसळतो व त्याचे कार्य पार पडते. तसेच या ग्रंथींना ‘वाहिनी-विहीन ग्रंथी’ असेही म्हणतात. अंतःस्रावी तंत्र शरीराच्या चयापचय, विकास, तारुण्य, ऊती क्रिया, व चित्त (मूड) या नियंत्रीत करत असतात. प्रत्येक स्त्रावाचे वेगवेगळे कार्य असते. स्त्राव तयार करणे व ते रक्तात प्रमाणात मिसळणे, यांचे नियंत्रण अंतःस्रावी ग्रंथी करतात.

शरीरात खालील प्रकारच्या अंतःस्रावी ग्रंथी असतात.



१. गावदुम ग्रंथि

२. पीयूष ग्रंथि - या ग्रंथीला पिट्यूटरी ग्रंथी म्हणतात. ही शरीराची मुख्य ग्रंथी आहे की जी सर्व अंतःस्रावी ग्रंथींचे स्त्राव नियंत्रीत करतात.

३. अवटु ग्रंथि - ह्या ग्रंथीला थायरॉईड ग्रंथी म्हणतात.

४. बाल्यग्रंथि - थायमस

५. आधिवृक्क ग्रंथि(अ‍ॅड्रिनल ग्रंथी)

६. स्वादुपिंड - ही ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथी व बाह्यस्रावी ग्रंथी आहे.

७. बीजांडकोष - ही ग्रंथी स्त्रियांमध्ये असते.

८. वृषण- ही ग्रंथी पुरुषांमध्ये असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →